Posts

Showing posts from December, 2016

कुक्कुट पालन व्यवसाय

                                                     कुक्कुट पालन व्यवसाय शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो.                    मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात.           घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्