Posts

Showing posts from October, 2016

पाणी परीक्षण करणे.

              पाणी परीक्षण करणे. उत्पादक काम: १.       पाण्यातील विविध घटक ओळखण्यास शिकणे. २.       पाणी परीक्षण करणे. संकल्पना :   पिण्यासाठी: पाणी पिण्यायोग्य आहे कि नाही हे पाणी तपासणीनंतरच ठरवावे. दूषित पाणी हे सर्व रोगांचे मूळ कारण आहे. स्वच्छ पाण्याच्या सेवनाने रोगांस प्रतिबंध करता येतो. यासाठी पाणी परीक्षण करून घेऊनच ते पिण्यायोग्य आहे कि नाही हे निश्चित करावे. प्रयोगशाळेत निरनिराळया तपासण्या करून ,   पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत काय , मैला पाणी मिसळले आहे काय ,   ते पिण्याजोगे शुध्द आहे काय ,   याचा अहवाल मिळतो. तपासणी शक्य नसल्यास पाणी शुध्द करून वापरावे. हल्ली पाणी तपासणीसाठी तयार किट्स मिळतात. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात कोली जीवाणूंसाठी पट्टी मिळते. ही पट्टी पाण्यात बुडवल्यावर तिचा रंग सेकंदानंतर बदलल्यास जीवाणू आहेत असे समजावे. याचा अर्थ म्हणजे पाणी दूषित आहे. असे पाणी शुध्द करूनच वापरावे. यासाठी ब्लिचिंग पावडर वापरावी लागेल. पूर्व तयारी : १.       बाजारातून पाणी परीक्षण ( पिण्याचे पाणी ) कीट खरेदी कर णे.