Posts

Showing posts from 2016

कुक्कुट पालन व्यवसाय

                                                     कुक्कुट पालन व्यवसाय शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो.                    मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात.           घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्

आवळा कॅन्डी

                                                 आवळा  कॅन्डी साहित्य : २० आवळे साखर १ टिस्पून आल्याचा रस किवा किसलेले आले. कृती: १) आवळे पाणी न घालता कुकरमध्ये शिजवून घ्यावे. २) आवळे चाळणीवर ठेवून पाणी निथळून घ्यावे. हे पाणी टाकून देऊ नये. आवळे हाताळण्यायोग्य झाले कि त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून बिया काढून टाकाव्यात. याला आल्याचा रस हलक्या हाताने लावून घ्यावा. ३) जितक्या वाट्या आवळ्याचे तुकडे असतील त्याच्या दीडपट साखर घ्यावी. (म्हणजे जर १ वाटी आवळ्याचे तुकडे असतील तर दिड वाटी साखर घ्यावी. २ वाट्या आवळ्याचे तुकडे = ३ वाट्या साखर) ४) साखर बुडेस्तोवरच पाणी घालावे (आवळ्याचे पाणी आणि लागल्यास अजून थोडे साधे पाणी घालावे). गोळीबंद पाक करावा. ५) पाक झाला कि आच बंद करावी आणि पाक गरम असतानाच त्यात आवळ्याच्या फोडी घालाव्यात. मिक्स करून किमान ८ ते १० तास मुरू द्यावे. ६) नंतर पाकातील फोडी अलगद बाहेर काढून प्लास्टिक पेपरवर सेपरेट करून ठेवाव्यात. ७ ते ८ दिवस उन्हात वाळवाव्यात. ७) उन्हाला जर जोर कमी असेल तर जास्त दिवससुद्धा लागू शकतात. व्यवस्थित कोरड्या होईस्तोवर वाळवाव्यात. ८) वा

मोरावळा

                                                   मोरावळा साहित्य: १ कप आवळ्याचा किस १ कप साखर २ ते ३ लवंगा कृती: १) कूकरमध्ये तळाला १ इंच पाणी घालावे. २) आवळ्याचा किस आणि साखर एकत्र मिक्स करून घ्यावे. कूकरच्या आतील स्टीलच्या डब्यात हे मिश्रण आणि लवंगा एकत्र करावे. या मिश्रणात पाणी अजिबात घालू नये. हा डबा कूकरमध्ये ठेवून १ ते २ शिट्ट्या कराव्यात. गॅस बंद करावा. ३) १० मिनीटांनी कूकर उघडून मिश्रण बाहेर काढावे - i) जर मोरावळा फ्रिजमध्ये ठेवायचा असेल आणि थोडा पातळसरच हवा असेल तर थेट काचेच्या बरणीत भरून झाकण लावावे व फ्रिजमध्ये ठेवावे. ii) जर मोरावळा बाहेर ठेवायचा असेल तर कूकरमधून बाहेर काढलेले मिश्रण पातेल्यात घालून, २ तारी पाक होईस्तोवर आटवावे. गार झाले कि बरणीत भरून ठेवावे. टीप: १) स्वादाकरता लवंग वापरण्याऐवजी, आवडीनुसार वेलची किंवा दालचिनीही वापरू शकतो.

म्हशीचे उत्पादन

                                       म्हशीचे उत्पादन आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशींच्या दुधाचा मोठा वाटा आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे, म्हणून म्हशींचे संगोपन चांगल्या रीतीने करण्याची गरज आहे. दूध उत्पादनाशिवाय मांसोत्पादन व ओढकामासाठीसुद्धा म्हशींचा/रेड्यांचा वापर केला जातो. म्हशींचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन केल्यास त्यापासून अधिकाधिक नफा मिळतो.  म्हशींच्या जाती ः   मुऱ्हा दिल्ली ः उत्तर भारतात, तसेच महाराष्ट्रात ही जात आढळते. शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण 1800 ते 2000 लिटर असते.  मेहसाणा ः ही जात सुरती व मुऱ्हा जातींच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळती जुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 2000 लिटरपर्यंत दूध देतात.  पंढरपुरी ः सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खां

हिरव्या मिरची चे लोणचे

          हिरव्या मिरची चे लोणचे  साहित्य: १ ते सव्वा कप हिरव्या मिरचीचे तुकडे (१ सेमी) ३ टेस्पून मिठ किंवा चवीनुसार १/३ कप मोहोरी पावडर (लाल मोहोरी) १/२ टेस्पून हिंग फोडणी: १/४ कप तेल , १/२ टिस्पून मोहोरी , १/२ टिस्पून हिंग , १/२ टिस्पून हळद १०-१२ मेथी दाणे कृती: १) मिरचीला आधी मिठ , हिंग लावून ठेवावे. २) तेल तापवावे. त्यात आधी मेथीदाणे तळून घ्यावेत. बाहेर काढून कुटावेत आणि मिरचीमध्ये घालावेत. ३) त्याच तेलात मोहोरी , हिंग , हळद घालून फोडणी करावी. हि फोडणी थंड होवू द्यावी. ४) फोडणी थंड झाली कि मिरचीमध्ये ओतावी , मोहोरी पावडर घालावी. सर्व निट मिक्स करून घ्यावे. ५) स्वच्छ व कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत हि मिरची भरून ठेवावी. ८ ते १० दिवस मुरू द्यावी. सर्व्ह करताना आयत्यावेळी लिंबाचा रस घालावा. Labels: Mirchi Lonache, Chili pickle, hot and spicy chili pickle, indian style chili pickle

गलाकार चकली

Image
                       गलाकार चकली  साहित्य: १०० ग्राम मैदा १५ ग्राम वनस्पती तूप चिमटीभर मीठ पिठी साखर , गरजेनुसार तेल किंवा तूप तळण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा. कृती: १) मैद्यामध्ये मीठ आणि वनस्पती तूप घालावे. मैद्याला वनस्पती तूप चोळून लावावे. तूप सर्व मैद्याला व्यवस्थित लागले पाहिजे. थोडे पाणी घालून नेहमीच्या कणकेपेक्षा थोडे घट्ट मळून घ्यावे. १५-२० मिनिटे झाकून ठेवावे. २) मळलेल्या पीठाचे साधारण १ इंचाचे गोळे करावे. प्रत्येकाची पातळ पुरी लाटावी. पुरीला उभ्या चिरा पाडाव्यात , पण कडा कापल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. चिरा शक्य तेवढ्या जवळजवळ असाव्यात म्हणजे चंपाकळी नाजूक बनतात. (वरील फोटो पहा) ३) चिरा पाडून झाल्यावर पहिल्या चीरेपासून रोल करत जावे. शेवटची टोके सील करत न्यावी. अशाप्रकारे आकाश कंदिलाप्रमाणे आकार येईल. ४) चंपाकळ्या तेलात मंद आचेवर तळाव्यात. कोमट झाल्या की पिठीसाखर भुरभुरावी.

कारंजी

         कारंजी  साहित्य: कव्हर- १/२ कप मैदा २ टेस्पून रवा २ टेस्पून तूप , मोहनासाठी चिमुटभर मीठ खायचा रंग (लाल किंवा हिरवा) २ ते ४ टेस्पून दुध सारण- १/२ कप किसलेले सुके खोबरे , भाजलेले १/४ कप पिठी साखर २ टेस्पून बारीक चिरलेले बदाम , पिस्ते , चारोळ्या १/२ टीस्पून वेलची पूड साटा- ३ टेस्पून तूप २ टेस्पून कॉर्न फ्लोअर इतर साहित्य- तळण्यासाठी तूप कृती: १) मैदा आणि रवा एकत्र करून २ टेस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन घालावे. चमच्याने ढवळून मीठ घालावे. दुध घालून मध्यमसर मळून घ्यावे. २० मिनिटे झाकून ठेवावे. २) तोवर सारण बनवावे. भाजलेले खोबरे हाताने चुरून घ्यावे. त्यात पिठीसाखर , बदाम-पिस्ते , आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे. ३) तूप हाताने फेसून घ्यावे. तूप हलके झाले कि कॉर्न फ्लोअर एकत्र करून फेसावे. ४) भिजवलेले पीठ दोन समान भागात विभागून घ्यावे. एका भागात २-३ थेंब रंग घालून मळून घ्यावे. ५) पांढऱ्या रंगाचा गोळा घेउन एकदम पातळ लाटून घ्यावे. त्यावर बोटाने खळगे करून घ्यावे. त्यावर फेसलेला साटा लावावा. ६) रंगीत गोळ्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. हि पोळी पहिल्या पोळीवर ठेव

चकली

             चकली  साहित्य: १ कप ज्वारीचे पीठ १ टिस्पून मैदा १/२ टिस्पून तीळ १/२ टिस्पून जीरे , अर्धवट कुटलेले १/४ टिस्पून ओवा १ टिस्पून लाल तिखट १/४ टिस्पून हिंग साधारण १/२ कप पाणी १/२ टिस्पून मीठ चकल्या तळण्यासाठी तेल कृती: १) ज्वारीचे पीठ मोठ्या सुती रुमालात बांधून पुरचुंडी बनवावी. कुकरमध्ये तळाला १ इंच पाणी घालावे. त्यात भोकाची ताटली ठेवावी. त्यावर कुकरच्या आतील डबा ठेवून त्यात पिठाची पुरचुंडी ठेवावी. २) कुकरच्या ३-४ शिट्ट्या होवू द्याव्यात. गॅस बंद करावा. कुकरचे प्रेशर कमी झाले कि कुकर उघडून पुरचुंडी काढावी. त्यातील पीठ जरा घट्ट झाले असेल. ३) हाताने गुठळ्या फोडून चाळून घ्यावे. त्यात मैदा , तीळ , जीरे , ओवा , लाल तिखट , हिंग आणि मीठ घालून मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालत मध्यमसर मळावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे. खूप घट्ट किंवा खूप सैलसुद्धा नको. ४) चकली यंत्राला आतून तेलाचा हात लावावा. चकलीची चकती बसवून साच्यात पीठ भरावे. कढईत तेल गरम करून आच मध्यम करावी. चकल्या पाडून बदामी रंगावर तळाव्यात. तळलेल्या चकल्या कागदावर काढून गार होवू द्याव्यात. नंतर हवाबंद डब्

वांग्याचा भात

            वांग्याचा भात  साहित्य: १ कप तांदूळ (बासमती किंवा तुकडा  बासमती चालेल) ७-८ लहान वांगी (साधारण १/४ किलो) , मोठ्या फोडी कराव्यात फोडणीसाठी:- २ टेस्पून तेल , १/४ टिस्पून मोहोरी , १/८ टिस्पून हिंग , १/४ टिस्पून हळद , ७-८ पानं कढीपत्ता १ टेस्पून   वांगीभात मसाला चवीपुरते मीठ वांगी तळण्यासाठी तेल १ तमालपत्र आणि १-२ वेलची कृती: १) तांदूळ पाण्यात १५-२० मिनिटे भिजत घालावा. पाणी काढून  टाकावे. भात मोकळा आणि जरा फडफडीत शिजवावा. शिजवताना  त्यात मीठ , तमालपत्र आणि वेलची घालावी. भात शिजल्यावर  तमालपत्र आणि वेलची काढून टाकावी. २) कढईत तेल गरम करून त्यात वांगी तळून घ्यावी. (खाली टीप पहा) ३) मोठ्या जाड बुडाच्या कढईत २-३ टेस्पून तेल गरम करावे. त्यात  मोहोरी , हिंग , हळद , कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात तळलेली  वांगी , थोडे मीठ आणि वांगीभात मसाला घालावा. लगेच भात  घालून मिक्स करावे. जर कोरडे कोरडे वाटले तर थोडेसे तूप  घालावे. चव पाहून लागल्यास मसाला किंवा मीठ घालावे. मंद आचेवर मिक्स करावे. कढईवर जड झाकण ठेवून

शेजवान सॉस

                    शेजवान  सॉस वाढणी : साधारण अर्धा कप हा शेजवान सॉस   चायनिज स्टर फ्राईड वेजिटेबल्स   बरोबर सर्व्ह  करावा तसेच इतर   चायनिज पदार्था   तही याचा वापर करता येतो. साहित्य: १ टिस्पून आले पेस्ट २ टिस्पून चिरलेले लसूण २ टेस्पून पाती कांदा १ टेस्पून पाती कांद्याची पाती १ टेस्पून चिरलेली कोथिंबीर १ टेस्पून चुरडलेल्या लाल मिरच्या दिड टेस्पून लाल तिखट १/३ कप टोमॅटो प्युरी १ टेस्पून सोया सॉस दिड टेस्पून व्हिनेगर २ टेस्पून तेल १ टिस्पून कॉर्न फ्लोअर १/४ टिस्पून साखर १/४ टिस्पून मिरपूड चवीनुसार मिठ शेजवान सॉस याही पद्धतीने करता येईल -   Schezwan Sauce कृती: १) कढईत तेल गरम करावे. त्यात आले लसूण फोडणीस घालावे , थोडा रंग बदलला पाती कांदा , कोथिंबीर आणि चुरडलेल्या लाल  मिरचीची पूड घालून मिक्स करावे. १ ते २ मिनीटे परतावे. २) नंतर लाल तिखट , टोमॅटो प्युरी , सोया सॉस , व्हिनेगर घालून निट  मिक्स करावे. साखर , मिरपूड आणि मिठ घालावे. सर्व एकत्र  ढवळून घ्यावे. ३) १ टिस्पून कॉर्न फ्लोअरमध्ये २ टेस्प

प्रोजेक्ट अहवाल २०१५-१६

Image
विज्ञान आश्रम पाबळ , ता . शिरूर . जि  .पुणे                                                                 प्रोजेक्ट अहवाल २०१५-१६                                                                                                                                                                                                                                                                            DBRT projact २०१६- 17 विभागाचे नाव        –    शेती व पशुपालन प्रोजेक्ट चे नाव        –   cow farming नाव                        –    रसाळ अमर अशोक   मार्गदर्शकाचे नाव   –    दादासो पाटोळे प्रोजेक्ट सुरु केल्याची तारिक   – १-१०-२०१६ प्रोजेक्ट बंद केल्याची तारिक – १०-११-२०१६                              समन्वयकाची                            मार्गदर्शकाची                                                                                                                                                              मुख्यध्यापकाची   सही