आवळा कॅन्डी




                                                 आवळा कॅन्डी

साहित्य :२० आवळे
साखर
१ टिस्पून आल्याचा रस किवा किसलेले आले.

कृती:
१) आवळे पाणी न घालता कुकरमध्ये शिजवून घ्यावे.
२) आवळे चाळणीवर ठेवून पाणी निथळून घ्यावे. हे पाणी टाकून देऊ नये. आवळे हाताळण्यायोग्य झाले कि त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून बिया काढून टाकाव्यात. याला आल्याचा रस हलक्या हाताने लावून घ्यावा.
३) जितक्या वाट्या आवळ्याचे तुकडे असतील त्याच्या दीडपट साखर घ्यावी. (म्हणजे जर १ वाटी आवळ्याचे तुकडे असतील तर दिड वाटी साखर घ्यावी. २ वाट्या आवळ्याचे तुकडे = ३ वाट्या साखर)
४) साखर बुडेस्तोवरच पाणी घालावे (आवळ्याचे पाणी आणि लागल्यास अजून थोडे साधे पाणी घालावे). गोळीबंद पाक करावा.
५) पाक झाला कि आच बंद करावी आणि पाक गरम असतानाच त्यात आवळ्याच्या फोडी घालाव्यात. मिक्स करून किमान ८ ते १० तास मुरू द्यावे.
६) नंतर पाकातील फोडी अलगद बाहेर काढून प्लास्टिक पेपरवर सेपरेट करून ठेवाव्यात. ७ ते ८ दिवस उन्हात वाळवाव्यात.
७) उन्हाला जर जोर कमी असेल तर जास्त दिवससुद्धा लागू शकतात. व्यवस्थित कोरड्या होईस्तोवर वाळवाव्यात.
८) वाळलेल्या फोडी प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवाव्यात.

टीपा :
१) फोडी जर नीट वाळल्या नाहीत तर टिकत नाहीत.
२) कॅन्डी तयार झाल्या कि त्याला बाहेरून थोडी भरड दळलेली साखर लावू शकतो. त्यासाठी वाळवलेल्या कॅन्डी वाटीभर भरड साखरेत थोड्या थोड्या करून घोळवून घ्याव्यात.
३) उरलेल्या पाकात थोडे मीठ आणि पाणी घालून सरबत बनवावे.

Comments

Popular posts from this blog

पाणी परीक्षण करणे.

POULTRY