शेजवान सॉस



                   शेजवान सॉस


वाढणी : साधारण अर्धा कप

हा शेजवान सॉस चायनिज स्टर फ्राईड वेजिटेबल्स बरोबर सर्व्ह

 करावा तसेच इतर चायनिज पदार्था तही याचा वापर करता येतो.


साहित्य:

१ टिस्पून आले पेस्ट

२ टिस्पून चिरलेले लसूण

२ टेस्पून पाती कांदा

१ टेस्पून पाती कांद्याची पाती

१ टेस्पून चिरलेली कोथिंबीर

१ टेस्पून चुरडलेल्या लाल मिरच्या

दिड टेस्पून लाल तिखट

१/३ कप टोमॅटो प्युरी

१ टेस्पून सोया सॉस

दिड टेस्पून व्हिनेगर

२ टेस्पून तेल

१ टिस्पून कॉर्न फ्लोअर

१/४ टिस्पून साखर

१/४ टिस्पून मिरपूड

चवीनुसार मिठ

शेजवान सॉस याही पद्धतीने करता येईल - Schezwan Sauce

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात आले लसूण फोडणीस घालावे,

थोडा रंग बदलला पाती कांदा, कोथिंबीर आणि चुरडलेल्या लाल 

मिरचीची पूड घालून मिक्स करावे. १ ते २ मिनीटे परतावे.

२) नंतर लाल तिखट, टोमॅटो प्युरी, सोया सॉस, व्हिनेगर घालून निट

 मिक्स करावे. साखर, मिरपूड आणि मिठ घालावे. सर्व एकत्र 

ढवळून घ्यावे.

३) १ टिस्पून कॉर्न फ्लोअरमध्ये २ टेस्पून पाणी घालावे आणि

मिक्स करावे. हे मिश्रण सॉसमध्ये घालावे व ढवळून मध्यम

 आचेवर १-२ मिनीटे उकळू द्यावे.

सॉस दाटसर झाला कि गॅसवरून उतरवावा. वरून चिरलेल्या पाती

 घालून मिक्स करावे.

टीप:

१) हा सॉस खुप तिखट असतो त्यामुळे वापरताना गरजेपुरताच

वापरावा किंवा लाल तिखटाचे प्रमाण कमी करावे.

२) उरलेला शेजवान सॉस लहान डब्यात भरून फ्रिजमध्ये ६-७

 दिवस सहज टिकतो.

Comments

Popular posts from this blog

पाणी परीक्षण करणे.

POULTRY