पाणी परीक्षण करणे.








              पाणी परीक्षण करणे.


उत्पादक काम:
१.      पाण्यातील विविध घटक ओळखण्यास शिकणे.
२.      पाणी परीक्षण करणे.


संकल्पना:  

पिण्यासाठी:
पाणी पिण्यायोग्य आहे कि नाही हे पाणी तपासणीनंतरच ठरवावे. दूषित पाणी हे सर्व रोगांचे मूळ कारण आहे. स्वच्छ पाण्याच्या सेवनाने रोगांस प्रतिबंध करता येतो. यासाठी पाणी परीक्षण करून घेऊनच ते पिण्यायोग्य आहे कि नाही हे निश्चित करावे.
प्रयोगशाळेत निरनिराळया तपासण्या करून, पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत काय, मैला पाणी मिसळले आहे काय, ते पिण्याजोगे शुध्द आहे काय, याचा अहवाल मिळतो. तपासणी शक्य नसल्यास पाणी शुध्द करून वापरावे.
हल्ली पाणी तपासणीसाठी तयार किट्स मिळतात.
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात कोली जीवाणूंसाठी पट्टी मिळते. ही पट्टी पाण्यात बुडवल्यावर तिचा रंग सेकंदानंतर बदलल्यास जीवाणू आहेत असे समजावे. याचा अर्थ म्हणजे पाणी दूषित आहे. असे पाणी शुध्द करूनच वापरावे. यासाठी ब्लिचिंग पावडर वापरावी लागेल.


पूर्व तयारी:
१.      बाजारातून पाणी परीक्षण(पिण्याचे पाणी) कीट खरेदी करणे.
२.      ज्या पाण्याचे परीक्षण करायचे आहे त्याचा नमुना घेणे.


शिक्षक कृती:

१.      पाणी परीक्षण करण्याचे महत्त्व सांगणे.
पाण्याचा नमुना कसा घ्यावा याची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगावी

विशेष माहिती:
            पाणी नुसत्या साध्या डोळयांनी पाहून शुध्द की अशुध्द हे सांगणे अवघड आहे.

 यासाठी प्रयोगशाळेत तपासणी करावी लागेल.
 
पाण्याचा नमुना कसा घ्यावा???

तपासणीसाठी सुमारे अर्ध्या लिटरच्या बाटलीत (बाटली १०-१५ वेळा त्याच पाण्याने धुवून)

 पाणी भरून २४ तासांच्या आत ते आरोग्य प्रयोगशाळेत पाठवावे लागते. यासाठी पक्के 

बूच असलेली बाटली निवडावी.
पाण्याची रासायनिक व भौतिक गुणधर्म तपासणी करण्यासाठी किट
पिण्याच्या पाण्यामध्ये अनेक क्षार व रसायने असू शकतात. पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्याची तपासणी/ परीक्षण करावी/करावे लागते. या किटचा वापर करून पुढील घटकांसाठी तपासणी करता येते.
१.     आम्ल- विम्ल निर्देशांक (सामू) – pH
२.     आयर्न (लोह) – Iron
३.     क्लोराईड – Chloride
४.     फ्लुराईड – Fluoride
५.     नायट्रेट– Nitrate
६.     टोटल हार्डनेस -Total Hardness
७.     टर्बीडीटी -गढूळपणा – Turbidity


अपेक्षित कौशल्य:
१.      पाणी परीक्षण करण्यासाठी पाण्याचा नमुना व्यवस्थितपणे घेता येणे.
२.      पाण्याचा रंग बदलतो हे निरीक्षणाद्वारे समजणे.
३.      पाण्यातील हानिकारक जीवाणूंची विद्यार्थ्याला कल्पना असणे.
४.      तपासणीसाठी साहित्याची हाताळणी करता येणे.


१.     अल्कलायनीटी – alkalinity
या व्यतिरिक्त बॅक्टोस्कोपने पाण्याचे जंतू प्रदूषण ओळखणे - बॅक्टोस्कोप ही सत्वर पाणी तपासणीची एक पध्दत आहे. यासाठी H2S Strip Bacteriological Field Test Kit वापरतात.
आता आपण या सर्व तपासणी कश्या कराव्या हे पाहू...


प्रथम पाण्यातील घटकांच्या तपासणीच्या पद्धती:

यातील फ्लूराईड, नायट्रेट, आयर्न, आम्ल-विम्ल निर्देशांक (pH)या घटकांच्या परीक्षण पद्धतींमध्ये रंगमापकाचा (colour comparator) उपयोग करण्यात आला आहे.

या रंगमापकामध्ये दोन भाग आहेत.

रंग तक्ता (Colour Chart)

रंगमापक युनिट (colour comparator)

वर दिलेल्या चार घटकांचे वेगवेगळे चार रंग तक्ते संचामध्ये असतात.

विज्ञान आश्रम – पाबळ येथे प्रेरणा लॅबोरेटरी, पुणे यांचेकडील पाणी परीक्षण संच वापरला जातो.

ज्या घटकांचे परीक्षण करायचे आहे त्या घटकाचा रंग तक्ता (Colour Chart) रंगमापक युनिटमध्ये (comparator unit) ठेवावा. रंगतक्ता सहजपणे रंगमापकामध्ये ठेवता येतो किंवा रंगमापकामधून काढता येतो. तसेच रंगतक्ता बदलून दुसऱ्या घटकाचे परीक्षण करता येते.

•रंगमापक वापरण्याची पद्धत:

•ज्या घटकांचे परीक्षण करायचे आहे त्या घटकाचा रंग तक्ता (Colour Chart) रंगमापक युनिटमध्ये (comparator unit) ठेवा. रंगमापक आता परीक्षणासाठी तयार आहे. दुसऱ्या घटकाचे परीक्षण करण्यासाठी पहिल्या घटकाचा रंगतक्ता रंगमापक युनिटमधून काढा व दुसऱ्या घटकाचा रंगतक्ता  तिथे ठेवा.  
 
१. आम्ल- विम्ल निर्देशांक (सामू) – pH
 
उद्देश पाण्याचा आम्ल- विम्ल निर्देशांक (सामू -pH) तपासणे.

लागणारे साहित्य पाणी परीक्षण कीट, पाण्याचा नमुना, सामू तक्ता (pH chart)

कृती

१.     परीक्षा बाटलीमध्ये १० मिली. पाण्याचा नमुना घ्या.

२.     त्यात रीयेजंट pH – १(Reagent pH - 1) चे ५ थेंब टाका.

३.     बाटलीचे झाकण बंद करून बाटली तिरपी करून हळुवारपणे ३-४ वेळा हलवा.

४.     त्यानंतर १ मिनिटासाठी स्थिर ठेवा.

५.     यानंतर रंग मापका(color comparator) मध्ये परीक्षा बाटली ठेऊन रंगतक्त्यातील कोणत्या रंगाशी आलेला रंग जुळतो आहे ते पडताळून पहा. रंगाची तुलना पुरेशा सुर्यप्रकाशातच करावी.

६.     तक्त्यात गुलाबी छटा असतात. त्यातील योग्य त्या छटेशी आलेला रंग जुळवून पहावा व योग्य ते अनुमान लिहावे.

निरिक्षण:

अनुमान: दिलेल्या पाण्याच्या नमुन्याचा आम्ल- विम्ल निर्देशांक ____ आहे.


उद्देश पाण्यातील लोहाचे प्रमाण (iron) तपासणे.

लागणारे साहित्य पाणी परीक्षण कीट, पाण्याचा नमुना, लोह तक्ता (iron chart).

कृती -  


१.       परीक्षा बाटलीमध्ये १० मिली. पाण्याचा नमुना घ्या.

२.       त्यात Fe-A द्रावणाचे(Reagent Fe -A) १० थेंब टाका.

३.       त्यात Fe-B द्रावणाचे(Reagent Fe -B) चे २ थेंब टाका.

४.       बाटलीचे झाकण बंद करून बाटली ५ मिनिटे तशीच ठेवा.

५.       यानंतर Fe-C द्रावणाचे(Reagent Fe -C) १० थेंब टाका व झाकण लावून हळुवारपणे हलवा.

६.       यानंतर रंगमापकामध्ये (color comparator) बाटली ठेऊन Fe रंगतक्त्यातील कोणत्या रंगाशी आलेला रंग जुळतो आहे ते पडताळून पहा. रंगाची तुलना पुरेशा सुर्यप्रकाशातच करावी.

७.       तक्त्यात केशरी रंगाच्या छटा असतात. त्यातील योग्य त्या छटेशी आलेला रंग जुळवून पहावा व योग्य ते अनुमान लिहावे.

निरिक्षण:

अनुमान: दिलेल्या पाण्याच्या नमुन्यात लोहाचे प्रमाण ____ पीपीएम आहे.  
  

 
३. फ्लुराईड – Fluoride


उद्देश –     
        पाण्यातील फ्लुराईडचे प्रमाण (fluoride) तपासणे.


लागणारे साहित्य  
               पाणी परीक्षण कीट, पाण्याचा नमुना, फ्लुराईड तक्ता (fluoride chart).  


कृती

     १.       परीक्षा बाटलीमध्ये ३ मिली. पाण्याचा नमुना घ्या.

     २.       त्यात F-10 द्रावणाचे (Reagent F-10) १० थेंब टाका.

     ३.       बाटलीचे झाकण बंद करून बाटली तिरपी करून हळुवारपणे ३-४ वेळा हलवा.

     ४.       त्यानंतर १ मिनिटासाठी स्थिर ठेवा.

१.       यानंतर रंगमापकात (color comparator) परीक्षाबाटली ठेऊन F तक्त्यातील कोणत्या रंगाशी आलेला रंग जुळतो आहे ते पडताळून पहा. रंगाची तुलना पुरेशा सुर्यप्रकाशातच करावी.

२.       तक्त्यात गुलाबी ते पिवळ्या रंगाच्या छटा असतात. त्यातील योग्य त्या छटेशी आलेला रंग जुळवून पहावा व योग्य ते अनुमान लिहावे.

निरिक्षण:

अनुमान: दिलेल्या पाण्याच्या नमुन्यात फ्लोराईडचे प्रमाण ____ पीपीएम आहे.


टीप: 
    जर पाण्याचा रंग, रंगमापकावरील दोन रंगाच्या मध्ये असेल तर दोन्ही रंगांचा/ कप्प्यांचा मध्यबिंदू हे फ्लुराईडच्या प्रमाणाचा मध्यबिंदू समजावा.
 

४. नायट्रेट– Nitrate
 
उद्देश  
           पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण (Nitrate) तपासणे.

लागणारे साहित्य  
                                पाणी परीक्षण कीट, पाण्याचा नमुना, १ मिली सिरींज, नरसाळे, नायट्रेट तक्ता (Nitrate chart).


कृती

      १.     परीक्षा बाटलीमध्ये १/२ मिली. पाण्याचा नमुना १ मिली सिरींजच्या मदतीने घ्या.

      २.     त्यात रीयेजंट N-1 चे २० थेंब टाका.

      ३.     नरसाळ्याच्या साहाय्याने रीयेजंट N-1 ची १०० मिलीग्रॅम पावडर परीक्षा बाटलीमध्ये घ्या.

      ४.     बाटलीचे झाकण बंद करून बाटली तिरपी करून हळुवारपणे ३-४ वेळा हलवा.

      ५.     त्यानंतर १ मिनिटासाठी स्थिर ठेवा.

१.     यानंतर रंग तुलनाकारात (color comparator) मध्ये बाटली ठेऊन Fl तक्त्यातील कोणत्या रंगाशी आलेला रंग जुळतो आहे ते पडताळून पहा. रंगाची तुलना पुरेशा सुर्यप्रकाशातच करावी.

२.     तक्त्यात गुलाबी रंगाच्या छटा असतात. त्यातील योग्य त्या छटेशी आलेला रंग जुळवून पहावा व योग्य ते अनुमान लिहावे.


निरिक्षण:


अनुमान:  
       दिलेल्या पाण्याच्या नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण ____ पीपीएम आहे.



Comments

Popular posts from this blog

POULTRY