शेळीपालन

                               शेळीपालन

 पैदाशीसाठी बोकडाची निवड :



 एखादी शेळी खराब निघाली तर फक्त तिची करडे निकृष्ट खराब पैदा होतील परंतु बोकड खराब   निघाला तर पूर्ण कळपाची करडे  खराब होतील.  म्हणून उत्पादनवाढीसाठी बोकडाचे महत्व अनन्यसाधारण आहे म्हणून  “ बोकडाला कळपाचा राजा ”  असे गौरवाने म्हटले जाते.
  सर्वसाधारणपणे कळपातील शेळ्यांच्या३ तेटक्के बोकड कळपात  पैदाशिकारिता ठेवावेत परंतु समाज आधारित (CommunityBased) शेळीपालन कार्यक्रम असेल तर 4० -५० शेळ्यांपर्यंत एक बोकड ठेवावा .
उत्तम बोकडाची लक्षणे खालीलप्रमाणे:
बोकड जातिवंत असावा. त्याच्यामध्ये जातीची  पूर्ण  लक्षणे असावीत 
बोकडाचे वय एक  ते दोन  वर्ष असावे आणि वजन ३० किलोच्या  पुढे असावे
बोकड खरेदी करताना शक्यतो  जुळ्यातील अथवा तिळ्यातील असावा
पाय मजबूत आणि खुर उंच असावेत. चारी पायांवर चांगली चाल असावी
सदृढ, डौलदार बंध, निकोप, निरोगी, तरतरीत नजर, उभार डोके आणि मर्दानी व्यक्तिमत्व असावे
अंडकोशांत दोन्ही वृषण उतरलेले असावेतएक वृषण ग्रंथी असलेला नर पैदाशीसाठी  निरोपोयोगी असल्यामुळे  खरेदी करू नये
ज्या  बोकडामुळे शेळ्यांच्या कळपामध्ये जुळ्यांचे /तिळे प्रमाण वाढते , गर्भपात होत नाहीत , करडान्मध्ये वजन वाढ चांगली होते, पुढील पिढी मध्ये दुध / वजन उत्पादन वाढते असा बोकड चांगला समजला जातो.

        बोकडाची पैदास पूर्वतयारी
एक  वर्षा वयातील बोकड पुनरुत्पादनासाठी सक्षम असत नाहीत्यामुळे त्याचा प्रजाजनासाठी  वापर करू नये,
कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याच कळपातमध्ये जन्मास आलेला बोकड आपल्याच कळपात पैदासीसाठी वापरू नये,
शेळ्यांमध्ये  अंतर्गत पैदास  होऊ नये म्हणून आपल्या कळपातील बोकड दर दोन वर्षांनी बदलणे जरुरीचे आहे,
नराचे वीर्य उत्पादन हंगामानुसार बदलते. थंड डोंगराळ प्रदेशांत किंवा दम-थंड हंगामात प्रजननचक्र अधिक कार्यक्षम असते. तर उन्हाळ्यातील  हवेतील  अधिक उष्णतेमुळे  प्रजनन कार्यक्षमता आणि वीर्य उत्पादनाचा वेग मंदावतो

             बोकडांचा  आहार
सरासरी ३० ते ३५ किलोच्या बोकडाला दरदिवशीतेकिलो सकस , प्रथिनयुक्त हिरवा चारा, ०. ५०० ते १.० किलो वाळेलेला चारा  आणि ३०० ते ३५० ग्रम्स          १८ ते २० % प्रथिने असलेला खुराक देणे आवश्यक आहे,
पैदाशीच्या  काळामध्ये  बोकड  शेळ्या  (METING)  थकू  नये म्हणूनतेकिलो  हिरवा चारा, १.५ तेकिलो वाळेलेला चारा आणि ४५० ते ५०० ग्राम्स खुराक देणे आवश्यक आहे,
  बोकडाला  नियमितपणे  व्यायाम  देणे  आवश्यक  आहे  अन्यथा  जाडी वाढल्यामुळे  माजावर  आलेल्या  शेळ्यांवरडी घेणार  नाही

              बोकडाची निवास व्यवस्था
एका बोकडाला बंदिस्त १५ चौ. फूट  जागा लागते आणि फिरण्यासाठी ३० चौ. फूट जागा लागते,
जेथे बोकड ठेवणार ती जागा हवेशीर असावी,
बोकडाचे  वाडे दररोज स्वच्छ करावेतमलमूत्र साठणार नाही ह्याची काळजी घ्यावीगोठे सतत कोरडे ठेवावेत,
वाड्यामध्ये खड्डे पडले असतील तर मलमूत्र अथवा पाणी साठू नये म्हणून ते वेळोवेळी  बुजवून टाकावेत, 
पाण्याचा हौद , चाऱ्याचा गव्हाणी यांना महिन्यातून एक वेळ चुना लावावा,
विताचा हंगाम आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जंतुनाशक अथवा किटकनाशकांची फवारणी करण्यात यावी,
रोगराईच्या काळांत बोकड ठेवलेल्या ठिकाणी चुन्याची पावडर किंवा ५ %  फिनायील यांचा वापर करून वाडे निर्जंतुक करावेत,
पिण्याच्या  पाणी निर्जंतुक व्हावे म्हणून  पोटाशीयम परमग्नेट (०.०१%) टाकावे
उन्हाळ्याचे दिवसांत पत्र्याच्या छतावर वाळलेले गावात अथवा उसाचे पाचात टाकावे

बोकाडांमधील रोगनिदानात्मक चाचण्या 
ब्रुसेल्लोसीस (Brucellosis): शेळ्यांमध्ये सांसर्गिक गर्भपात होवू नये म्हणून बोकडांमध्ये ही चाचणी करून घेणे आवश्यक आहे, 

जोन्स रोग (johns’ Disease) : शेळ्यांमध्ये आतड्याचा क्षय रोग होवू नये म्हणून ही चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
           लसीकरणाचे वेळापत्रक

पेस्टी डी पेटीट रुमिनंट (P.P.R.)
एप्रिल 
शेळ्यामधील देवी
एप्रिल
आंत्रविषार
एप्रिल, मे आणि पंधरा दिवसांनी बुस्टर मात्र द्यावी
घटसर्प
जुन-जुलै
  लाळया- खुरकूत रोग (FMD)
ऑक्टोबर-नोव्हेंबर,उत्पादकांच्या सूचनेनुसार
टिप: लसीकरण  करण्यापूर्वी  अथवा केव्हांही  लेंड्या तपासूनच  कृमिनाशक  औषध  आवश्यकतेनुसार पाजा. शेळ्यांच्या आहारामध्ये रोगप्रतिकारशक्ती टिकून राहण्यासाठी खनिज  मिश्रणाचा समावेश करा

        बोकडांचा विमा 
विम्याचे महत्व :
 बोकड  मृत्यू पावल्यांस शेळीपालकांचे  आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून सार्वजनिक  क्षेत्रामधील विमा कंपन्या अथवा भारतीय विमा नियंत्रण विकास प्राधिकरण (Indian Insurance Regulatory Authority) ह्याच्याकडे नोंदणी केलेल्या विमा कंपन्यांकडून  बोकडांचा विमा उतरविण्यांत यावा,  
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी 
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी
ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी,
न्याशनल इन्शुरन्स कंपनी (National Insurans Company)
खाजगी क्षेत्रांतील विमा कंपन्या ,
oरिलायंस इन्शुरन्स कंपनी,
oबजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी
पैदाशीसाठी खरेदी केलेला बोकड कळपांत तीन वर्षे दिवस ठेवण्यांत येणार असल्यामुळे त्याचा तीन वर्षाचा विमा उतरविल्यांस विमा हप्त्यावर २५ % सूट मिळते त्याचा फायदा घ्यावा त्यामुळे दरवर्षी विमा नुतनीकरण करून घेणे तीन वर्षे तरी गरज राहणार नाही .

  बोकडांचा विमा (पुढे चालू) 
 बोकडांचा विमा  उतरविल्यांस खालील बाबी लक्षांत ठेवाव्यांत ,   
विमा  पोलीसि (Insurance Policy) ठरलेल्या तारखेस मुदतबाह्य होण्या अगोदर तिचे नुतनीकरण करण्यांत यावे,
बोकडांना लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण आणि कृमिप्रतीबंधक औषध पशुधन विकास अधिकारी , पशु चिकित्सालय , पंचायत समिती ह्यांच्या मार्गदर्शनानुसार पाजुन घ्या. ह्या सर्व औषधोपचाराच्या नोंदी ठेवा. कारण ह्याच नोंदी दुर्देवाने बोकड मरण पावल्यांस पुरावा नुकसानीचा दावा मंजूर व्हावा  म्हणून उपयोगी पडतील ,  
बोकड आजारी पडल्यांस नजिकच्या पशुधन विकास अधिकारी ,पशुचिकित्सालय , पंचायत समिती यांजकडून औषधोपचार करून घ्या,
बोकडाचा कानातील ओळख दर्शविणारा बिल्ला ( बाळी TAG) हरविल्यांस तात्काळ विमा कंपनीला लेखी काळवा कारण बिल्ला हरविलेला बोकड मरण पावल्यास ‘बिल्ला नाही म्हणून दावा नामंजूर’ हे विमा कंपनीचे धोरण असल्यामुळे विमा दावा नामंजूर झाल्यांस बोकड पालकाचे आर्थिक नुकसान होईल,
प्रत्येक बाबीच्या  नोंदी ठेवा.
बोकड मरण पावल्यांस तात्काळ विमा कंपनी आणि नजिकच्या पशुधन विकास अधिकारी ,पशुचिकित्सालय ह्यांना लेखी कळवा.


Comments

Popular posts from this blog

पाणी परीक्षण करणे.

POULTRY