शेळीपालनाचे महत्व

            शेळीपालनाचे महत्व  
शेळीपालनांत गटाचे महत्व :
 गट स्थापन करण्या मागचे प्रमुख उद्देश,
शेळीपालन व्यवसायाला संघटित स्वरूप देणे,
शेळीपालकाना विविध सुविधा पुरविणे उदा.
oशेळीपालन व्यवस्थापन  प्रशिक्षण,
oशेळ्यांची अनुवांशिक सुधारणा करण्यासाठी बोकडांचा पुरवठा ,
oआरोग्य सुविधा (दैनंदिन आजाराकरिता वेळेवर पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे,  जंतप्रतिबंधक औषधांचा पुरवठा, बाह्यकिटकांचे निर्मुलन ,  संसर्गजन्य रोगप्रतिबंधक लसीकरण, प्रथमोपचार पेटी पुरविणे  इ.)
oएकत्रितपणे चारा -खाद्द्य खरेदी आणि त्याचे वाटप करणे
oशेळ्यांच्या विक्री गटाव्दारे ( विशेषतः  वजनावर) करण्याबाबत जागृती निर्माण करणे,
  
oआपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी गटांतर्गत बचतीची सवय लावणे.
               गट निर्मिती  
गटांतील शेळीपालक सामाजिक –आर्थिकदृष्ट्या समान असावेत,
९-१० शेळीपालकांचा गट असावा आणि गटांत पैदासक्षम शेळ्यांची संख्या ४५-५० असावी,
गटाच्या प्रत्येक सभासदाकडे किमान ३-४ तरी शेळ्या असाव्यात,
सर्व सभासदांमध्ये सहकार्याची भावना असावी,
गटातील सभासदांना नोंदी ठेवण्याची आवड असावी,
गटांतील प्रत्येक सभासदांनी  पर्यावरणपोषक वृत्तीने शेळीपालन करावे.
       बकरीमैत्रीणीची निवड 
  बकरी मैत्रीणचे निकष :
बकरीपालनामध्ये आवड असावी,
शेळीपालन करणाऱ्या कुटुंबातील असावी,
प्रसन्न, उत्साही आणि उत्स्फूर्तपणे काम करणारी,
काम करतांना मनमोकळी (पारदर्शक) आणि समाजांत मान  असणारी,
बोलणारी  आणि शेळीपालनांतील  इतर घटकांशी  संबंध प्रस्थापित करू शकणारी,
शेळीपालकांचे प्रश्न जाणून त्यावर समर्पक उत्तर शोधणारी,
किमान आठवी पास  जेणेकरून ती गटाच्या नोंदी ठेवू शकणारी,
शेळीपालनांतील आधुनिक /नाविन्यपूर्ण कल्पना स्वीकारणारी ,
गावांत कायम वास्तव्य असणारी  आणि गटाच्या विकासासाठी वेळ देवू शकणारी असावी.
      बकरी मैत्रणीची कामे आणि  कर्तव्ये
शेळी पालकांचे गट निर्मिती,
एक बकरी मैत्रीण गावांतील अथवा लगतच्या गावांतील असे मिळून तीन ते चार गटासाठी काम करेल,
शेळीपालकांच्या आवश्यकतेनुसार आणि शेळीपालन कार्यक्रमाविषयी माहिती आणि जागरुकता निर्माण व्हावी म्हणून “प्रवेश कार्यक्रम (Entry Point Activity) “ अंतर्गत  जंतप्रतिबंधक औषध पाजणे, रोगप्रतिबंधक लसीकरण
  बकरी मैत्रणीची कामे आणि  कर्तव्ये (पुढे चालू) 
पायाभूत सर्वेक्षण (Baseline Survey) करणे,
गटाची नियमितपणे सभा घेवून त्यांना मार्गदर्शन करणे,
विविध सेवा उपलब्ध करून देण्याबाबत दूवा म्हणून काम करणे,
शेळीपालकांशी भेटून त्यांच्या अडचणी समजावून घेवून त्यांना मार्गदर्शन  करणे,   
शेळीविकास कार्यक्रम विषयक विविध  नोंदी ठेवणे.
    गटाच्या  मासिक सभेतील विषय
कालावधी
विषय
एप्रिल, मे, जुन
पुढील वर्षाच्या कामांचे नियोजन ,
पैदाशीसाठी बोकडांची निवड आणि ते तंदुरुस्त राहावेत म्हणून खाद्दाचा पुरवठा ,
पावसाळ्यापूर्व जंत प्रतिबंधक औषध पाजणे , बाह्य किटक निर्मुलन, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक लसीकरण करणे,
शेळीपालकांचे  प्रशिक्षण ह्यांमध्ये ‘उन्हाळ्यांत  शेळ्यांची काळजी  कशी घ्यावी” ह्याबाबत भर देण्यांत यावा,
पैदाशीतील नाविन्यपूर्ण कार्यक्रम उदा. “एकाच वेळी शेळ्या माजावर आणणे (Heat Synchronization) “
तत्कालीन महत्वाचे विषय
       गटाच्या  मासिक सभेतील विषय 
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
जर जंत प्रतिबंधक औषध पाजणे आणि लसीकरण करणे शिल्लक असेल तर ते पूर्ण करणे,
शेळीपालकांचे प्रशिक्षण त्यामध्ये पावसाळ्यांतील शेळ्यांची निगा, शेळ्यांतील माज ओळखणे, गाभण शेळ्यांची काळजी,

काही शेळ्या व्याल्या असतील तर त्यांची आणि करडांची काळजी ,
तत्कालीन महत्वाचे विषय


गटाच्या  मासिक सभेतील विषय
कालावधी
विषय
ऑक्टोबर, नोव्हेंबर , डिसेंबर
जर जंत प्रतिबंधक औषध पाजणे आणि लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण करणे,
शेळीपालकांचे प्रशिक्षण त्यामध्ये हिवाळ्यांतील  शेळ्यांची निगा,  गाभण शेळ्यांची काळजी, व्यालेल्या शेळ्या, नवजात करडांची काळजी आणि वाढणाऱ्या करडांची देखभाल,
तत्कालीन महत्वाचे विषय


 लक्षांत असू द्या ---
 शेळीपालनाची पांच सूत्रे –
oचांगली वजनदार करडे मिळविण्यासाठी जातिवंत बोकडांचा पैदाशीसाठी वापर,
oवेळापत्रकानुसार जंतप्रतिबंधक औषध पाजणे आणि  रोगप्रतिबंधक लसीकरण,
oचाऱ्याचे बारमाही नियोजन आणि घरासभोवताली चारा रोपांची लागवड,
oशेळ्यांची गटाव्दारे आणि वजनावर विक्री करणे,
नियमितपणे शेळी व्यवहारांतील नोंदी ठेवणे .




Comments

Popular posts from this blog

पाणी परीक्षण करणे.

POULTRY